आ. श्रीमंत पाटील : शिरगुपी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार, स्वसहाय्य संघांना 40 लाखांचे धनादेश
बेळगाव : गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारी रोगामुळे भयावह स्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा बिकट परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात ठेवून वैद्याधिकारी, आशा कार्यकर्ता व अंगणवाडी महिला कर्मचारी तसेच पत्रकार मंडळीं या कोरोना योद्ध्यांनी सामाजिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले योगदान हे सर्वश्रेष्ठ असल्याचे गौरवोउद्गार
माजी मंत्री व कागवाडचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील यांनी काढले.
शिरगुप्पी (ता. कागवाड) येथील श्री मल्लिकार्जुन सभामंडपाच्या कार्यालयात श्रीमंत (तात्या) पाटील फाउंडेशन व कागवाड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या संयुक्त सहकार्याने कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कागवाड आश्रमाचे परमपूज्य यतिश्वरानंद स्वामीजी, कृष्णा कित्तूरचे प.पू. बसवेश्वर स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. म्हणून चिकोडी जिल्हा भाजप पक्षाचे अध्यक्ष डॉ. राजेश नेरली, युवा नेते श्रीनिवास पाटील, डॉ. आनंद मुतालीक, तालुका वैद्य अधिकारी बसगौडा कागे,अँड. अभय अकीवाटे , शितल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर होत.
श्रीमंत पाटील म्हणाले, समाजात स्त्रियांना मान सन्मान देत आदरयुक्त पूज्य भावनेने समाज त्यांच्याकडे पाहिला तर निश्चितच त्यांच्याकडून समाज उन्नतीसाठी आदर्श कार्य होऊ शकते. प्रत्यक्ष आपला जीव धोक्यात ठेवून समाजाला जीवदान देण्याचे श्रेष्ठ काम आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी महिला यांच्या हातून घडल्याने आपण सर्वजण महामारीच्या कालावधीत जगलो आहोत. या श्रेया बद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तर ते कमीच असल्याचे त्यांनी सांगितले.
कागवाड गुरुदेव आश्रमाचे यतिश्वरानंद स्वामीजी म्हणाले, कोरोना काळात माजी मंत्री व कागवाड चे आमदार श्रीमंत पाटील यांनी आपल्या फाउंडेशनच्या अंतर्गत राबवलेली सेवा कौतुकास्पद आहे. विशेषता कागवाड मतदारसंघाला असा संयमी स्वभावाचा लोकनायक आ. श्रीमंत पाटील यांच्या रूपाने लाभल्याने मतदारसंघातील अनेक समस्या मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्नाटक शासनाच्या वतीने 40 महिला स्वयं सहाय संघाना प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश वितरण करण्यात आला.
यावेळी दादा पाटील, रामगोंडा पाटील, ऍड. निंगाप्पा कोकले, तालुका पंचायत सदस्य सुधाकर भगत, शिवानंद पाटील, राम सोड्डी, अनिल कडोले, जयपाल यरडोले, यांच्यासह कागवाड मतदारसंघातील आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी महिला कर्मचारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta