Friday , April 17 2026
Breaking News

कमतनूर-निडसोसी सेंटर येथे तिहेरी वाहन अपघातात एक ठार

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : कमतनूर-निडसोसी सेंटर येथे आज दुपारी ३ वाजता घडलेल्या तिहेरी वाहन अपघातात रस्ता मजूर जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कमतनूर निडसोसी रस्ता येथे आज दुपारी विचित्र तिहेरी वाहन अपघात घडला आहे. आज दुपारी 3 वाजता बेळगांवहून चिकोडीकडे भरधाव वेगात निघालेल्या मालवाहू ट्रक क्रमांक टीएन 56/एच 8914 ने पाठीमागून ट्रॅक्टर ट्राॅलीला जोराची धडक देऊन समोरुन येणाऱ्या बुलेरो क्रमांक केए 22/ सी 7937 ला धडक देऊन हा अपघात घडला आहे. अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीत बसलेल्या चार रस्ता निर्माण मजुरापैकी रामप्पा भिमराय गस्ती (वय 38) राहणार बेनकेनहोळी तालुका हुक्केरी जागीच ठार झाला आहे. अपघातत अन्य मंजूर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी एएसआय आर. जी. पाटील, मुरगेश जंबगी, आर. एच. मुदपाकी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. त्यांनी लागलीच जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *