बेळगाव : मी माझ्या वैयक्तिक कामासाठी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळी त्यांचे चिरंजीव आणि इतर कार्यकर्त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी वृत्तपत्र व समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली.
मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता आहे. समितीच्या ध्येय धोरणाशी मी बांधील आहे, असे म्हाळू मजुकर यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचा हा कुटील डाव आहे. घडल्या प्रकारामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो व माझा अध्यक्षपदाचा राजीनामा पंचकमिटीकडे सुपूर्द करत आहे व यापुढे देखील मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास बांधील आहे. आपण जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल अश्या आशयाचे पत्र बेळगांव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बाकनूर-बडस समितीकडे म्हाळू मजुकर यांनी दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta