बेळगाव : यरगट्टी येथे महिनाभरापूर्वी झालेल्या किराणा दुकानातील चोरी आणि घरफोडीच्या प्रयत्नातील दोन आरोपींना मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 51,000/- रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली 2,00,000/- रुपयांची कार आणि एक रॉड असा एकूण 2,51,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामदुर्गचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोड पोलिस निरीक्षक मौनेश्वर माळी पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन कर्मचारी के. बी. अलगराऊत, व्ही. डी. सक्री, एम. बी. सन्ननाईक, ए. व्ही. ज्योतेन्नवर, बी. एस. अंतगर्टी, आय. एस. वकुंड, एस. एम. जवळी यांनी या प्रकरणाचा छडा लावला.
बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी या पथकातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta