बेळगाव : बेळवट्टी ते कर्ले रस्ता पावसामुळे कर्ले शिवरातून वाहून गेला आहे तसेच २ कि.मी. रास्ता हा पूर्णतः खड्डयांनी व्यापला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बेळवट्टी गावाशेजारील असलेला पूलही अर्धा वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः धोक्याची झाली आहे. तरी या भागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta