
बेळगाव : अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जुन्या भाजी मार्केट जवळील पेट्रोल पंपाजवळ सकाळी सकाळी ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज सकाळी फिश मार्केटजवळ कॅम्प येथे ट्रकच्या धडकेत इस्लामिया उर्दू शाळेचा विद्यार्थी अरहान बेपारी याचा जागीच मृत्यू झाला. बहीण अतिका आणि आयुष आजरेकर हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोपर्यंत शेकडो लोक या ठिकाणी जमा झाले होते.
शहर दक्षिण रहदारी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान अपघातानंतर बघ्यांची गर्दी वाढली. संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
शहर उपनगर परिसरात होत असलेल्या वाढत्या अपघातांबद्दल नागरिक आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान दिवसभरात शहरातील प्रमुख मार्गांवरून अवजड वाहनांची वर्दळ वाहनधारकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने दिवसभरात शहर उपनगरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
आ. अनिल बेनके, डीसीपी पीव्ही स्नेहा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Belgaum Varta Belgaum Varta