बेळगाव : दोन दिवसांत दोन शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू होऊनही बेळगाव पोलिसांना गांभीर्य वाटलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कॅम्पवासीयांनी आज सकाळी आंदोलन केले.
बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात स्पीडब्रेकर बसवावेत आणि शाळेच्या वेळेत पोलिस तैनात करावेत, या मागणीसाठी कॅम्पवासियांनी आंदोलन केले.
बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा अवजड वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला आहे. तरीही कॅम्प परिसरातील शाळांसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नाही. तसेच कालच्या अपघातस्थळी दाखल झालेले आमदार अनिल बेनके आणि डीसीपी स्नेहा यांनी अधिक सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले. मात्र आज याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेला नाही. अवजड वाहनांना बंदी घातली नसल्याच्या निषेधार्थ कॅम्प परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनाचे वृत्त समजताच वाहतूक विभाग एसीपी शरणप्पा, कॅम्प पोलीस स्थानकाचे सीपीआय प्रभाकर धर्मट्टी आणि वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
Belgaum Varta Belgaum Varta