बेळगाव : अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन कार्यक्रम गुरूवारी करण्यात आला.
ओबीसी मोर्चा राज्य सेक्रेटरी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव आणि श्री. सोमनाथ धामणेकर यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले.
श्री विठ्ठलाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे. या ठिकाणी सुंदर बांधकाम आणि सजावट करण्यात येणार आहे दानशूर भाविकांच्या आर्थिक मदतीतून मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर, संदीप तुबची, बाळू धामणेकर, विवेक शहापूरकर, बसवंत बसरीकट्टी, राहुल मुचंडी आदी मान्यवर तसेच युवक, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta