Saturday , October 19 2024
Breaking News

खिळेगाव- बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होईल : आमदार श्रीमंत पाटील

Spread the love

 

अथणी : दुष्काळ भागातील शेतकऱ्याचा वरदान ठरणाऱ्या खिळेगाव बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळणार याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून तलाव भरण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्याच दिवशी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली.
चमकिरी बँडरहटी रस्ता दोन कोटी, गुंडेवाडी शिवनूर दहा लाख, गुंडेवाडी चमकेरीमधील रस्ता चाळीस लाख,
बेवनूर येते जलजीवन मशीन साठ लाख कामाचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायतचे अध्यक्ष विठ्ठल उगारे, मारुती किरळे, काकासाहेब चौगुले, मुरगप्पा मगदूम,
शिवानंद शंकरहटी, नानासाहेब आवताडे, आर. पी. अवताडे, बी. के. चनरेडी होते.
आमदार पाटील म्हणाले, मला एकच ध्यास दुष्काळ भागाचा विकास करण्याचा उद्देश आहे. शेती हिरवीगार करण्याचा माझा उद्देश आहे. सर्वांचे सहकार्याचे अत्यावश्यकता असून कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसेल तो रस्ता डांबरीकरण आहे. एखाद्या वेळी रस्ता चुकून राहिला असेल तर डांबरीकरण करण्याचा माझा उद्देश आहे. मतदारसंघातील सर्वच रस्ते सुशोभीकरण पाण्याची समस्या शाळा इमारत याला अधिक प्राधान्य दिले आहे.
यावेळी शिवानंद गोलभावी, आबा चव्हाण, पोलीस अभियंता वीरांना वाली, ईश्वर मुजगुनीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *