Monday , April 20 2026
Breaking News

8 ऑगस्ट रोजी आयोजित धरणे आंदोलन यशस्वी करू

Spread the love

 

खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचे आवाहन

बेळगाव : 8 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून जोमाने धरणे आंदोलन यशस्वी करूया असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले.

खानापूर म. ए. समितीची बैठक आज शिवस्मारकात झाली. या बैठकीमध्ये तालुक्यामधील मराठी विभागामध्ये विभागवार बैठका घेऊन 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाची जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले. 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मध्यवर्ती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात खानापूर तालुक्यामधून मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी गावामध्ये जाऊन जोमाने जागृती करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी जनजागृती विषयी कार्यकारणी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली व तालुक्यातील इतर समस्याबद्दल साधक बादक चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव, गोपाळ पाटील, पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील, रवींद्र पाटील, पांडुरंग सावंत, रवींद्र शिंदे, रणजीत पाटील, राजीव पाटील, बळीराम पाटील, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, अनंत झुंजवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेबाळकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन

Spread the love  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *