Sunday , July 26 2026
Breaking News

ऐनापूरला मंदिर कळस निर्मिती समारंभ

Spread the love

 


आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : उत्तम बांधकामाबाबत प्रशंसा
कागवाड : ऐनापूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा कळस उभारणी समारंभ माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी त्यांनी येथे बांधलेल्या मंदिराची पाहणी करून उत्तम बांधकाम झाल्याची पोचपावती दिली.
ऐनापूर येथे विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आता कळस उभारणी करण्यात येणार आहे. याचे पूजन व दिपप्रज्वलन आ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णा कित्तूर गुरूदेव आश्रमाचे पपू बसवेश्वर स्वामी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर आ. पाटील म्हणाले, आपण विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली आहे, मंदिराचे बांधकाम उत्तम झाले आहे. आता कळसारोहण बाकी आहे. हे कामही अशाच पद्धतीने उत्तम दर्जाचे व्हावे, ही अपेक्षा आहे. यासाठी काहीही मदत लागल्यास आपल्याकडून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी मंदिर व्यवस्थापनाला केले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने आ. पाटील यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी ऐनापूर येथील स्थानिक नेते, कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *