Wednesday , December 10 2025
Breaking News

बेळ्ळारी नाल्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करा; पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची सुचना

Spread the love

 

बेळगाव : नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे कोणत्याही प्रकारचे पीक किंवा घराचे नुकसान झाल्यास तातडीने भरपाई देण्यात यावी. घरांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ संबंधित ग्रामपंचायतींमध्येही प्रदर्शित करावेत. याबाबत जनतेच्या काही हरकती असतील तर त्यामध्ये लक्ष घालावे, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, एकही जलाशय भरला नसल्याने तूर्तास पाणी सोडू नये, पुराच्या वेळी झालेल्या नुकसानीचा सर्वंकष अहवाल शासनाला पाठवावा, कल्लोळ बॅरेज येथे पर्जन्यमापक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बेळ्ळारी नाल्यातून दरवर्षी समस्या भेडसावत आहे. नाल्याचा सर्वंकष सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल पाठविण्यात यावा. प्रमुख, मध्यम व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा. जिल्हा प्रशासनाकडून चांगले काम केले जात असून ते यापुढेही सुरू ठेवावे, असेही कारजोळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील आणि शेजारील महाराष्ट्रातील एकही जलाशय भरला नसल्यामुळे सध्या तरी पुराचा धोका नाही.
बेळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याचे काम नरेगा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांनी दिली.

पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा आयुक्त अशोक दुडगुंटी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, उपविभागीय अधिकारी संतोष कामगौडा, रवींद्र कारलिंगनवर, शशिधर बागली, जिल्हा नगरविकास नियोजन कक्ष प्रकल्प संचालक ईश्वरा उळगगड्डी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *