बेळगाव : बेळवट्टी भागात सततचा मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची संरक्षण भिंत (कंपाऊंड) काल दि. 7 ऑगस्ट रोजी कोसळली. भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती बीआरसी, गट शिक्षणाधिकार्यांना दिली आहे. तरी याची पाहणी करून शिक्षण खात्याने संरक्षण भिंतीसाठी अनुदान लवकरात लवकर मंजूर करावे, असे आवाहन शाळा सुधारणा कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांकडून होत आहे.