Tuesday , March 3 2026
Breaking News

शहापूर पोलीस स्थानक हद्दीतील श्रीगणेश उत्सव मंडळाची शांतता बैठक उद्या

Spread the love

बेळगाव : सालाबादप्रमाणे 31/8/2022 रोजी श्रीगणेश उत्सव बेळगाव भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो शांततेत पार पाडण्यासाठी शहापूर पोलिस स्थानक हद्दीतील सर्व श्रीगणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ यांच्यासोबत उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर तोडगा काढण्याबद्दल चर्चा करण्यासाठी श्री जिव्हेश्वर मंगल कार्यालय, सोनार गल्ली क्रॉस,येळ्ळूर रोड, मा.वडगाव येथे उद्या दि. 13 रोजी सायंकाळी 6 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ मंडळीनी बैठकीला मोठ्या संख्येने हजर राहुन श्रीगणेश उत्सव चर्चेत भाग घेऊन सहकार्य करावे, असे शहापूर पोलिस स्थानक अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *