Wednesday , March 4 2026
Breaking News

सम्राट अशोक चौक येथे गणेश मंडपाची मुहूर्तमेढ

Spread the love

बेळगाव : शहरातील ऐतिहासिक अशा रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळाच्या यंदाच्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवार दि. 14 रोजी विधिवत करण्यात आली.
गल्लीतील ज्येष्ठ पंचांच्यावतीने ही मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत 90 वर्षे पूर्ण केली असून 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. पण यंदा हे विघ्न बहुतेक टळल्यामुळे उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्याचा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.
मुहूर्तमेढ प्रसंगी सुहास कोवाडकर, रमाकांत पेडणेकर, ईश्वर किल्लेकर, कपिल नारळीकर, चेतन कारेकर, यश कारेकर, श्रीधर चौकशी, अनिल नारळीकर, अनुप नारळीकर, अनिल कवळेकर, विश्वेश आंबेवाडीकर आदी पदाधिकारी व गणेशभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *