
येळ्ळूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तसेच नवहिंद को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक कै. एल. आय. पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येळ्ळूर येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
येळ्ळूर येथील अंगणवाडी, येळ्ळूर मॉडेल स्कूल, मराठीवाडी शाळा, श्री शिवाजी विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल तसेच चांगलेश्वरी हायस्कूल आदी शाळांमध्ये या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी दर्शन एल. पाटील, अनिल ग. पाटील, मूर्तीकुमार माने, पवन हावळ, अनिल पुंडलिक पाटील, प्रशांत कंग्राळकर व इतर सहकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta