बेळगाव : बेळगाव येथील साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज चन्नम्मा नगर येथील अंकुर या विशेष मुलांच्या शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. शाळेच्या चेअरपर्सन आणि सीईओ गायत्री गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाप्रसंगी साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर म्हणाल्या की, या विशेष मुलांच्या समवेत आम्हाला रक्षाबंधन साजरा करण्याचे भाग्य लाभले.
यावेळी अंकुर शाळेच्या शिक्षिका शुभांगी कुरणकर, वैशाली भातकांडे, राजश्री दोरकाडी, युवराज हुलमणी आदी शिक्षक तसेच साईज्योती संघाच्या व्हाईस चेअरमन ज्योति बाके, सेक्रेटरी सुमंगला पुजारी, सारिका सिंदगी, विना चौगुले, पल्लवी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta