बेळगाव : येथील इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) फोर्सच्या हालभावी येथील ट्रेनिंग कॅम्पमधून दोन एके-47 रायफल चोरीला गेल्या असल्याचे समजते.
एके-47 रायफल चोरीला गेल्या असल्याने आयटीबीपी आणि पोलिस अधिकारी हैराण झाले आहेत. काकती पोलिसांनी विशेष पथक तयार करून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
मदुराईच्या 45 व्या बटालियनचे बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील ट्रेनिंग कॅम्पमध्ये नक्षलविरोधी प्रशिक्षणासाठी आलेल्या राजेश कुमार आणि संदीप मीना यांना दिलेल्या रायफल्स चोरीला गेल्या होत्या. 17 ऑगस्टच्या रात्री हे दोघे कर्मचारी बॅरेकच्या तिसर्या मजल्यावर झोपलेले असताना या रायफल्स चोरीला गेल्याची तक्रार काकती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
Belgaum Varta Belgaum Varta