बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्व फाउंडेशनच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारपासून आणखी एक शाखेचा प्रारंभ करण्यात येत आहे.
रक्त, लघवी तपासणीचा वाजवी दरात मिळणारा अचूक रिपोर्ट नागरिकांना पसंत पडला आहे. दरम्यान डॉक्टर उदय साठे यांनी आपली कडोलकर येथील जागा अथर्व फाउंडेशनला वापरासाठी मोफत देऊ केली आहे. त्यामुळे येत्या रविवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या लॅबचे उद्घाटन आणि डॉक्टर उदय साठे यांचा सत्कार बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अनेकांनी आजवर दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळेच आम्ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही लॅब चालवू शकलो, असे अथर्वचे अध्यक्ष विजय पाटील व चिटणीस संतोष चांडक यांनी सांगितले
Belgaum Varta Belgaum Varta