Sunday , July 26 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग

Spread the love

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे दिनांक 21 ते 27 ऑगस्ट हे 7 दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही भाषेत होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे? आत्मा काय आहे? पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी 99018 47044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *