
बेळगाव : येळ्ळूर येथील मुख्य स्मशानभूमी गेली कित्येक महिने अस्वच्छ होती. यामुळे याठिकाणी गावातील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. व डासांचा पैदास वाढला होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन स्मशान स्वच्छता केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, राजू डोंन्यानावर, रूपा पुण्यानावर, सुवर्णा बिजगरकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta