Tuesday , March 3 2026
Breaking News

वॉकर्स ग्रुपचे बुधवारी संमेलन

Spread the love

 

बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे संमेलन बुधवारी (ता. 24) सायंकाळी 5 वाजता सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना हॉल (उत्सव हॉटेलमागे) येथे होणार आहे. कोरोना महामारीमुळे सदर संमेलन तीन वर्षांनी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव असतील. कार्यक्रमावेळी डॉ. हलगेकर हे आरोग्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वॉकर्स ग्रुपतर्फे कृष्णा मजुकर, प्रदीप परब, रमेश रायजादे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *