
जे. के. फाउंडेशन आणि प्रगतिशील परिषदतर्फे व्याख्यान आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
बेळगांव : कला जीवनात परिपक्व आणि आनंददायी अनुभव देते; कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नसून आपण त्याला आत्मीयतेने स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत, कार्यात सातत्य कायम ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रामाणिक खडतर प्रयत्न करून निच्छित ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवे. विविध क्षेत्रात स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्यात शैक्षणिक क्षेत्र म्हटले की स्पर्धेसाठी जणू रसिकेच लागलेली असते. अभ्यासामध्ये दिवसरात्र एक करून, अनेक विद्यार्थी आपले नशीब आजमावतात. पण यशस्वी तोच होतो जो योग्य मार्गदर्शन, अचुक नियोजन, व आपल्या कार्यात सातत्य ठेवतो. असेच कार्य करून निलजी गावातील यशस्वी मुलानी घरची परिस्थिती हालाखीची असताना देखिल आपले ध्येय गाठले. दहावीच्या वार्षिक परिक्षेत प्रथम, द्वितीय, त्रूतीय क्रमांक मिळविलेल्या कु. सुषमा महिपत पाटील, कुमारी साक्षी बाळाराम मोदगेकर व कुमार कुलदिप पुन्नाप्पा मणूरकर या विद्यार्थ्यांचा 75 व्या आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्ष औचित्य साधून सत्कार करण्यात आला. निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे, असे प्रतिपादन कल्लाप्पा मोदगेकर यांनी “स्पर्धात्मक काळात नियोजपूर्वक आखणी एक जबाबदारी चिंतन” या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.
जे. के. फौंडेशन बेळगांव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या संयुक्त निलजी तालुका बेळगाव येथे दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एसएसएलसी, बारावी, आणि पदवी महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल यशस्वी मुलांचा गौरव व सत्कार सोहळा आणि व्याख्यानाचे नुकताच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमूख वक्ते आणि संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा मोदगेकर होते.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर उपाध्यक्ष भरमाणी कदम,
यल्लाप्पा पाटील, शरद पाटील, अनंत मोदगेकर, सुधीर लोहार, सागर गुंजिकर, नारायण पाटील, प्रा. एन. एन. शिंदे, अनिल पाटील, प्रा. राजाराम पाटील उपस्थित होते.
स्वागत योगेश मोदगेकर व प्रास्ताविक – सचिव अप्पाजी गाडेकर यांनी केले. परिचय सुनिल चौगुले यांनी करून दिला. सूत्रसंचलन – प्रा. नारायण पाटील यांनी केले तर आभार – भरत वर्पे यांनी मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक रसिक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta