Saturday , October 19 2024
Breaking News

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाकडून विविध मागण्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन सादर

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात उदभवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
शहरात सुमारे 357 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या मनपा इमारतीत, टिळकवाडी येथील येथील मनपा कार्यालय, तसेच मनपाच्या इतर विभागवार कार्यालयात श्री गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणावी. शहर व उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे लाल माती व मुरूम न घालता कायमस्वरूपी बुजविणे, मंडप परिसर स्वच्छ करणे तसेच मंडपाला जोडणाऱ्या सर्व संपर्क रस्त्यांची स्वच्छता राखणे, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाला हेस्कॉमतर्फे जी विद्युत जोडणी केली जाते ती मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर असलेल्या उच्च दाबाच्या तारा उंच करून देणे व वनखात्यातर्फे रस्त्यावर आडव्या आलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, शहराच्या प्रमुख रस्त्यावर व चौकामध्ये प्रखर विद्युतझोताचे हॅलोजन बसविणे, प्रमुख रस्त्यांवर आणि मुख्य चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करणे तसेच शहरात ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करणे, गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्यपरिवहन मंडळाच्या बसेस शहर तसेच ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत चालू ठेवणे, शहरातील प्रमुख रस्त्यांवर व चौकांमध्ये गणेशदर्शन स्थळ नकाशाची व पाणपोईची व्यवस्था करणे, रस्त्यावरील अनावश्यक विद्युत खांब हटविण्यात यावेत, उघड्या असणाऱ्या गटारींवर तात्काळ फारशी बसविण्यात यावी, गोगटे सर्कल ते मराठा मंदिर तसेच शनिमंदिर ते कपिलेश्वर मंदिर पुलाची रेल्वे खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ डागडुजी करावी, तसेच सर्व विसर्जन तलावांवर विसर्जन करण्यासाठी पाटासह हैड्रोलीक क्रेन, ध्वनिवर्धक, जलतरण प्रशिक्षक, सुरक्षा रक्षक व भाविकांसाठी प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करणे, विसर्जन मिरवणूक मार्गातील मातीचे ढिगारे तात्काळ हलविणे, अर्धवट बांधण्यात आलेल्या गटारी तसेच रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करणे, तसेच अनंतचतुर्थी दिवशी वनिता विद्यालय ते संभाजी चौक परिसरात प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने श्रीगणेश हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकाची सोय करून प्रत्येक उत्सव मंडळाला अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक यादी देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, विकास कलघटगी, सतीश गोरगोंडा, गणेश दद्दीकर, सागर पाटील, विशाल कंग्राळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *