
महापौरपद सामान्य, तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी
बेळगाव : बेळगाव महापालिकेचे महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण अखेर नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. 24 व्या सभागृहासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगावचे महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असेल.
आरक्षणा जाहीर झाल्यामुळे
महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया लवकरच होणार असल्याची दाट शक्यता आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पण, नगरविकास खात्याने सप्टेंबर 2019 चे आरक्षण लागू केल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. बेळगावची महापालिका निवडणूक 3 सप्टेंबर रोजी झाली असून 6 मार्च रोजी मतमोजणी झाली आहे. पण, महापालिका निवडणूक झाल्यावर नगरविकास खात्याने महापौर व उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण देण्यास विलंब लावल्याने महापौर निवडणुकीला विलंब लागला. विलंबाला अनेक कारणे आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर महापालिकेने प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यास विलंब लावला. प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी नगरसेवकांचा पक्ष व प्रभाग आरक्षणाच्या माहितीसह नव्याने राजपत्रात नोंद करणे आवश्यक असल्याची सूचना दिली.
या नव्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta