बेळगाव : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिना दरम्यान राबविण्यात आलेल्या ” हर घर तिरंगा” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचे अभियान हाती घेतले जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि विमल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव विशेष प्रयत्नशील आहेत. त्यांनी आज अलारवाड गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे भावचित्र सुपूर्द केले.
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा देण्याचा आपला मानस असल्याचे यावेळी बोलताना किरण जाधव यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीमंडपात लावण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आपल्याकडून घेऊन जावी असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.