Tuesday , March 3 2026
Breaking News

माउंट अबू राष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी बेळगावातील पत्रकार रवाना

Spread the love

 

बेळगाव : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी बेळगावातून पत्रकार आज शनिवारी रवाना झाले आहेत.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी अबू रोड शांतीवन येथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर संमेलन आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर अबु रोड येथे पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक शांतता आणि सद्भभावनेत पत्रकारांचे योगदान मोलाचे असते. पत्रकारांनी सामाजिक शांतता आणि सद्भभावनेच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्य करावे. याचे हेतूने संपूर्ण देशभरातील पत्रकारांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आमंत्रित केले जात असते. यावर्षीही सदर संमेलनात देशातील मान्यवर उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे बेळगाव मीडिया विभाग प्रमुख श्रीकांतभाईजी, श्री विश्वनाथभाईजी यांनी संमेलनासाठी रवाना झालेल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पत्रकारांच्या व्यवस्थेसाठी बेळगावतून श्री महंतेशभाईजी माउंटबुला रवाना झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *