Friday , March 6 2026
Breaking News

नीट परीक्षेत उचगावच्या कन्येचे अभिनंदनीय यश

Spread the love

 

ऋचा पावशे हिचा राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक

उचगाव : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात (NEET) परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक प्राप्त करून उजगावची कन्या ऋचा पावशे हिने बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. ऋचा ही डॉ. श्री. मोहन व डॉ. सौ. स्मिता पावशे यांची कन्या आहे. डॉ. पावशे हे मूळचे उचगाव (ता. बेळगाव) येथील आहेत. सध्या बेळगाव येथे त्यांचे वास्तव्य आहे.

दरम्यान (NEET) परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल ऋचा आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला असता, या सर्वांनी यशाचे गमक सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऋचा पावशे म्हणाली की,।मी बेळगाव तालुक्यातील मराठी मुलगी असून नीट परीक्षेत यश प्राप्त करून बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याचा अभिमान वाटत असल्याचे ऋचाने सांगितले. माझ्या यशात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ, शाळेतील शिक्षक- शिक्षिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून तिने सर्वांचे आभार मानले. नीट परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धती अवलंबण्यात येते एखादे उत्तर चुकले तर मार्क वजा होतात याची भीती असते, याची भीती वाटली का असे विचारले असता निगेटिव्ह मार्किंग पद्धतीची भीती होती पण अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वादामुळेच या परीक्षेला धैर्याने सामोरी गेले असे ऋचा म्हणाली. तसेच येत्या काळात नीट परीक्षा देणाऱ्यांसाठी जिद्द आणि चिकाटी बाळगून खूप अभ्यास करा स्वतःला वेळ द्या अशा शब्दात तिने मार्गदर्शन केले.

ऋचा ही सेंट झेवियर्स, आरएलएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. या परीक्षेत तिने 720 पैकी 715 गुण मिळवून उज्वल संपादन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *