Thursday , March 5 2026
Breaking News

दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळल्याने युवक जागीच ठार

Spread the love

 

बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळून युवक जागीच ठार झाल्याची घटना आरटीओ सर्कल पाच नंबर शाळेसमोर मंगळवारी सकाळी घडली आहे. राकेश सुलधाळ (वय 26) रा.सिद्धनहळळी बेळगाव असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आहे की, सदर युवक दुचाकीवरून आरटीओकडून कोर्टकडे जात होता. अन्य एक दुचाकीस्वार या घटनेत जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी मार्केट एसीपी एन. व्ही. भरमनी, पीएसआय विठ्ठल हावनावर यांच्यासह पोलिस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन रहदारीचा अडथळा दूर करत रस्त्यावर कोसळलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *