काकती ग्रामस्थ, प्रगतिशील परिषद व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे व्याख्यान आणि 130 शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न
बेळगाव : देश व कुटुंबाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच राजमार्ग आहे. तळागाळापर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणे म्हणजे या देशातील गरिबांची संख्या कमी करणे आहे. तात्पुरता योजना देऊन तात्पुरती पोटाची भूक भागेल; पण त्याच्या आयुष्याची कायमची भूक भागवायची असेल तर शिक्षण हाच मार्ग आहे. शिक्षक हा सरकरी कर्मचारी नाही; तर ते राष्ट्राचे निर्माते आहेत. त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येणे हे कोणत्याही देशासाठी भूषणावह नाही. आधुनिक काळामध्ये संपूर्ण जगभरातील थैमान घातलेल्या वैश्विक कोरोना महामारीने जनजीवन विस्कळित झालेले होते यामुळे संपूर्ण जग थांबले होते. त्याचा परिणाम जगभरावर मोठ्यप्रमाणावर उमटलेला होता. त्यामुळे कोणत्याच क्षेत्राला या महामारीने सोडलेले नाही हे दिसून आले होते. याचा फटका वेळोवेळी बसलेला आहे. प्रत्येकांच्या आयुष्यात येणारे प्रसंग भेडसावत आहेत. भूतलावरील प्रत्येक माणसाला? दुःखाचे उंबरठे ओलांडून जगावे लागते. दु:ख व वेदना एकत्र घेऊन जगायला शिकले तरच वेगळ्या आनंदाची प्राप्ती होते. दुसर्याला आनंद देण्यासाठी वेदनाही पदरात घ्यायला हव्यात. निसर्गाशी संवाद साधता आला तर आपल्याला आयुष्याचा अर्थ समजतो. संवेदना बोथट होऊ न देता जबाबदारी आणि ओझे यातला फरक जाणून घेणे म्हणजेच आयुष्य होय. अपेक्षांचे ओझे व्यापक आणि मोठे असते. ते मर्यादित ठेऊन जगण्यासारखा दुसरा आनंद नाही. आपण सर्वजण आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करीत असतो, असे प्रतिपादन समाजसेविका ज्योती गवी यांनी जीवनात गुरूंचे महत्व आणि देशाच्या निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान : समाजाची जबाबदारी एक चिंतन या विषयांवर व्याख्यानात त्या बोलत होत्या.
काकती ग्रामस्थ आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव, माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काकती विभागातील मराठी, कन्नड, ऊर्दू, इंग्रजी, अंगणवाडी टीचर, आशा वर्कर सर्व माध्यमांच्या शाळांमधील 130 शिक्षकांचा सत्कार सोहळा आणि समाजसेविका ज्योती गवी यांचे जीवनात गुरूंचे महत्व आणि देशाच्या निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान : समाजाची जबाबदारी एक चिंतन त्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन शनिवार दि. 10/09/2022 रोजी सकाळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा काकती येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर होते.
व्यासपीठावर प्रमूख वक्ते म्हणून समाजसेविका ज्योती गवी, प्रमुख पाहूणे बसवराज घाणघेर, जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेते किरण करंबळकर, वीरभद्र मुंगरी, सिद्राय गवी, महेश रंगाई, गजानन गव्हाणे, परशराम नार्वेकर, संजय सोमाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी काकती विभागातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील 130 शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत सुनिता गव्हाणे, प्रस्ताविक शिक्षिका के. एल. जगताप यांनी केले. परिचय प्रेमा येतोजी व लक्ष्मी कुरबर यांनी करून दिला. सूत्रसंचालन एस. व्ही. पाटील व ए. बी. आरवळी यांनी केले. तर संध्या पाटील यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta