Friday , March 6 2026
Breaking News

आणखी एक झाड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान..!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील आरटीओ सर्कलजवळ झाड पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेपाठोपाठ आणखी एक झाड कोसळल्याची घटना आज घडली. विशेष म्हणजे वन खात्याच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली असून त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
बेळगाव येथील मार्केट पोलीस स्टेशन आणि वनविभागाच्या कार्यालयाजवळ मोठे झाड कोसळून इनोव्हा वाहनासह इतर वाहनांची नासधूस झाली. दोन रिक्षा आणि एक इनोव्हा झाडाखाली अडकल्या. सुदैवानेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वनविभाग आणि पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. झाडाचा बुंधा व फांद्या कापून झाड हटविण्यात आले.

 

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *