बेळगाव : बेळगांव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व इतर मालमत्तेची नुकसान भरपाई योग्य पद्धतीने देण्यात यावी. एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळोवेळी बदल करून नुकसानभारपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केली आहे.
याबाबत एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वामुळे शेतकर्यांना अत्यंत कमी पीक भरपाई मिळत आहे. बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन 400 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल बेळगाव जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला असून 105 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वे बदलणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केंद्र सरकार कडे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने अनेक शहरांची रस्त्यांची नावे बदलली आहेत. मात्र एनडीआरएफ ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल न करता केंद्र सरकार सामान्य शेतकर्यांवर एकप्रकारे अन्याय करत आहे.