शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ
कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे नुकतेच मोफत महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. याचा शेकडो लोकांनी लाभ घेतला.
शेडबाळ येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शासनाच्या विविध योजना जाहीर होतात. परंतु, सर्वसामान्य जनतेला या योजनांचा लाभ कसा घ्यायचा याची कल्पना नसते. माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्याकडून कागवाड मतदार संघासाठी विविध योजना मंजूर करून आणल्या जातात. परंतु, या योजना प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रीमंत पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करताना दिसते. फाउंडेशनमुळे सर्वसामान्यांना श्रमकार्ड, आयुष्यमान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन यासह अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यांना या योजनांचा लाभ मिळू शकलेला नाही त्यांनी श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची जरूर संपर्क साधावा, त्यांना योजना मिळवून देण्यासाठी फाउंडेशन नेहमीच सिद्ध आहे, असे आवाहन श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी केले.
शेडबाळ येथे विविध योजनांच्या माहितीसह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी शेडबाळ येथील स्थानिक नेते, नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी, तसेच श्रीमंत पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta