बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांनी आपला वकिली व्यवसाय सांभाळताना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. रयत संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच सीमा लढ्यातही सक्रिय सहभाग घेऊन वेळोवेळी झालेल्या आंदोलनात ते अग्रणी होते. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. माजी नगरसेवक ॲड. अमर येळ्ळूरकर यांचे ते वडील होते.
Belgaum Varta Belgaum Varta