Friday , March 6 2026
Breaking News

बेळवट्टी ’महालक्ष्मी’तर्फे विद्यार्थी, गुणीजणांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळवट्टी-बोकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 16 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनिमित्त विद्यार्थी व गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते.
संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाणा नलावडे, नामदेव पाटील, पांडुरंग देसाई, दत्तू कांगुटकर, शिवाजी कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पांडुरंग नलावडे यांनी गणेश पूजन केल्यानंतर म्हात्रू चौगुले यांनी लक्ष्मीदेवीचे पूजन केले. संचालक अशोक मजूकर यांनी सरस्वती पूजन, बाळकृष्ण पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तर, विठ्ठल चौगुले यांनी विठ्ठल-रुक्माई देवीचे पूजन केले.
संचालक डॉ. अर्जुन पाटील, पांडुरंग नाईक, उपाध्यक्ष परशुराम गाडेकर, टी. के. कांबळे, वैष्णवी सुतार, सावित्री चौगुले, नामदेव गायकवाड आदींच्या हस्ते गुणीजणांचा व गुणी सभासदांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे दहावी, बारावी व पदवी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणी मुलांचा पारितोषिक व रोख रक्कम देऊन यावेळी गौरविण्यात आले. अंध विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हीने दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवल्याबद्दल अध्यक्ष बी. बी. देसाई यांच्याहस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला.
सोसायटीच्या सचिव सौ. मयूरी हरगुडे यांनी सोसायटीचा अहवाल सादर करून पुढील वर्षाचे अंदाजपत्रक बैठकीसमोर ठेवले त्यास टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष देसाई यांनी संस्थेच्या 15 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेऊन भावी काळात हाती घ्यावयाच्या योजना मांडल्या. संचालक पांडुरंग नाईक, टी. के. कांबळे यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक मजूकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *