बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले.
यावेळी श्री दुर्गादेवी मूर्तीसाठी सोळाहजार पाचशे रुपये मोहन मोरे यांनी दिले. दरवर्षी गेली पाचवर्षे मोहनराव यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळते.
सोमवारी दुर्गादेवीची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. नवरात्र उत्सव प्रेरणादायी होण्यासाठी गावातील युवकांनी तयारी सुरु केली आहे.
या नऊ दिवसात दांडिया, गायन, रांगोळी, वेषभूषा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
यावेळी गोपाळ जाधव, मनोहर मोरे यशवंत जाधव, पांडुरंग मोरे, किरण यळुरकर, राजू बाचीकर, नागेश जाधव, प्रल्हाद ओऊळकर, रवळू मोरे, संतोष मोरे, बाळू यळुरकर, विशाल यळुरकर, निवृती कारवेकर, शेखर मोरे, प्रसाद जाधव, विक्रम बाचीकर, अजित मोरे, यलापा ओऊळकर, विठ्ठल बाचीकर, परशराम मोरे, भुजंग मोरे, प्रज्योत ओऊळकर, नारायण प. मोरे आदी कार्यकर्ते हजर होते.
शेवटी आभार अॅड. मनोहर प. मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta