बेळगाव (प्रतिनिधी) : उपसंचालक, पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि गोमटेश संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, हिंदवाडी-बेळगाव यांच्या संयुक्त सहयोगाने बेळगाव जिल्हास्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयीन 2022-23 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी घेण्यात आलेल्या सिलंबम्ब स्पर्धेत 35 ते 60 किलो वजनी गटात मुलींच्या विभागात अपर्णा मोटरे, लक्ष्मी ए. सांबरेकर, श्रुती जोमणे यांनी तर मुलांच्या विभागात 35 ते 75 किलो वजनी गटात सक्षम जाधव, रोहित पाटील, सुमित बिर्जे, विशाल सिदनाळ, कृष्णा धामणेकर, प्रीतम पेंतेड यांनी पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेत स्वयंम कित्तुर, मृणाल लोहार, प्रज्वल गोंधळी, यश तरळे, सुमित यांनी रौप्य पदक मिळविले.
पदवी पूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक व्ही. नागराज, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि माजी आमदार संजय पाटील तसेच गोमटेश विद्यापीठाचे प्रभारी प्राचार्य महेश कारेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत निवड झालेल्या विविध गटातील सुवर्णपदक पदक विजेत्यांची राज्यस्तरीय सिलंबम्ब स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
हे यशस्वी सिलंबम्बपटूं बेळगाव जिल्हा अम्याचुअर सिलंबम्ब असोसिएशनचे सचिव आणि सिलंबम्ब प्रशिक्षक लक्ष्मण वाय. नाईक तसेच सुहास व वक्कुंद व आकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशस्वी सिलंबम्बपटूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta