बेळगाव : सराफ गल्ली शहापूरमधील अल्पभूधारक शेतकरी नारायण(बाळू) बुध्दाप्पा लाड यांच्या गाईला लम्पीस्किन लागण होऊन अंगभर गाठी, ताप येऊन अशक्त झाल्याने खासगी डॉक्टरकडून उपाय करुन घेतले. कारण सरकारी डॉक्टर चांगला उपाय करत नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मनात भवना झाल्याने ते खासगी डॉक्टरनां बोलावून उपाय करुन घेत होते.पण त्याचा कांहीच उपयोग न झाल्याने आज पहाटे त्यांची गाय दगावल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. बळ्ळारी नाल्याच्या बाजूला शेती असल्याने त्यातही नुकसान, आता घरचा आर्थिक रहाटगाडा चालवणारे जनावर गेल्याने हे शेतकरी कुटूंब अत्यंत दुखी झाले आहे. त्यामूळे परिसरातील जनावरं पाळणाऱ्यांच्यात धास्ती निर्माण झाली आहे.
सरकारने लम्पीने दगावलेल्या जनावरांची महाराष्ट्र सरकारप्रमाणे भरपाई देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे रयत संघटनेतर्फे कालच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दोनच दिवसापूर्वी देवगण हट्टीतील रामलिंग बेडरे यांचीसुध्दा गाय लम्पीस्किननेच दगावली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta