बेळगाव : प्रगतशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिवंगत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे.
रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांचे ‘बॅ. नाथ पै यांचे जीवन कार्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शेखर पाटील आणि प्रगतशील लेखक संघाचे सचिव प्रा. निलेश शिंदे यांनी केले आहे.