यरगट्टी : यरगट्टी येथील मूट्टूत फायनान्सजवळ गुरुवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
या अपघातात ट्रक चालक रंगाप्पा पाटील (३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील गौडाप्पागौड अमरगौड (२५), वीरभद्रगौड एस. दबी (३२) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमरगौडा मालीपाटील (58) आणि हनुमंत गौडा बेटगेरी (23) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta