बेळगाव : मारिहाळ पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बी. एस. बाळगन्नावर आणि पोलिस हवालदार आर. एस. ठालेवाडे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सुळेभावी गावात 6 ऑक्टोबरच्या रात्री दोन गटात मारामारी सुरू असल्याची माहिती या दोन्ही पोलिस कर्मचार्यांना दिली असता त्यांनी सदर बाब वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणून न देता त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्तव्यात कसूर झाल्याने ही हत्या झाल्याची ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आला आणि पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी त्या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला.
Belgaum Varta Belgaum Varta