Sunday , December 7 2025
Breaking News

गणेश दुध संकलन केंद्राकडून प्रतिलिटर 1.60 पैश्यांची वाढ

Spread the love

 

संचालक उमेश देसाई यांची माहिती

बेळगाव : गणेश दुध संकलन केंद्राच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधात प्रतिलीटर 1.60 पैश्यांची वाढ केल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश देसाई यांनी दिली.
बेळगांव वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्रात झालेल्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना उमेश देसाई म्हणाले की, यापूर्वी सप्टेंबरमध्ये गाईच्या दुधाला दरवाढ दिली होती. मात्र आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. 4.0 फॅट आणि 8.5 एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला प्रतिलीटर 33 रुपये 60 पैसे मिळणार आहेत. यापूर्वी हा दर प्रतिलीटर 32 रुपये दर दिला जात होता. नवीन दरवाढ 7 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आली आहे. शेतीपुरक व्यवसायामध्ये दुग्धव्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय मनाला जातो. पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हा व्यवसाय केल्यास हा व्यवसाय शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल. शेतकर्‍यांनी बदल स्वीकारावा, असे उमेश देसाई यांनी सांगितले.
पशुपालन करत असताना शेतकर्‍यांना परवडेल असा दर अपेक्षित असतो. जनावरांना लागणारा चारा, खुराक व इतर गोष्टींचा विचार करता शेतकर्‍यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहणे गरजेचे असते. दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी गणेश दूध संकलन केंद्र नेहमीच कटिबद्ध असेल, असेही यावेळी बोलताना उमेश देसाई यांनी सांगितले.
शेतकरी व दुध संस्थांच्या हितासाठी केंद्रातर्फे सातत्याने उपाययोजना आखल्या जात असून संस्थांकडून उत्पादकांना किती दर मिळतो यासाठी शेतकर्‍यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. गणेश दूध संकलन केंद्रातर्फे उत्पादकांच्या हिताचाच विचार केला जाईल, असे व्यवस्थापक सुधाकर करटे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *