बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभागाच्या नूतन अध्यक्षपदी (chairman) मुकेश पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष वीरधवल उपाध्ये, उपाध्यक्ष प्रवीण सामसुखा, सरचिटणीसपदी नितीन पोरवाल, चिटणीसपदी अशोक कटारिया, कोषाध्यक्ष आकाश पाटील, सहकोषाध्यक्ष विजय पाटील, आणि संचालक मंडळचे सदस्य हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन आणि गौतम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सन २०२२-२४ साठी प्रशासकीय मंडळाची नवीन निवड प्रक्रिया यावर्षी पार पडली. ऑक्टोबर 11 मंगळवारी रोजी शहरातील शगुन गार्डन येथे शपथविधी सोहळा होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta