बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याकरिता दिनांक 10 व 11 ऑक्टोंबरला गाडीकोप शिवमोगा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता सृष्टी जाधव प्रतिनिधित्व करणार आहे. सृष्टी जाधव ही जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे, क्रीडा प्रशिक्षक विनय नाईक, मुख्याध्यापक प्रणव पित्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सृष्टी जाधव समाजसेविका माधुरी जाधव यांची कन्या आहे.
Belgaum Varta Belgaum Varta