Tuesday , March 3 2026
Breaking News

तिसऱ्या उड्डाणपुलाला पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याबाबत चर्चा

Spread the love

 

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राज्योत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव शिस्तबद्ध आणि भव्यपणे साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

आज सोमवारी (दि. 10) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वतयारीच्या प्राथमिक बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत कर्नाटक राज्योत्सव सोहळ्यासंदर्भात व्यापक स्वरूपात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर टिळकवाडी तिसऱ्या उड्डाणपुलाला दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली आहे.

राज्योत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शिस्तबद्ध उत्सवासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *