बेळगाव : बैलहोंगलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर -बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या श्रद्धा करेगार, केएलएस स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या अदिती चिखलव्हाळे, अल्पसंख्यांक मोरारजी देसाई रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतन विजयकुमार पाटील, केएलएस स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या वैष्णवी व्ही तसेच केएलएसमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या निश्चल सखदेव याने आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक मिळविले.
या बुद्धिबळपटूंची कारवार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीचे संचालक आणि बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल यशस्वी बुद्धिबळपटूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta