Friday , March 6 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळच्या सुवर्णमहोत्सवच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन

Spread the love

 

बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात आली.

हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक गुरूवार दिनांक 13/10/2002 रोजी हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षपदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर हे होते. बैठकीमध्ये संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर, प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री. आय. बी. राऊत यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. रामदास धुळजी, श्री. चेतन हूंदरे, श्री. विनोद लोहार, श्री. शुभम नांदवडेकर, श्री. किरण टक्केकर यांनी विचार मांडले. चर्चेअंती पुढीप्रमाणे पदाधिकारी व कार्यकारणीची निवड करण्यात आली.

अध्यक्ष – श्री. रामदास धुळजी, कार्याध्यक्ष – श्री. चेतन हुंदरे, उपाध्यक्ष – श्री विनोद लोहार, श्री. सतिश धामणेकर, श्री. शुभम नांदवडेकर, उप कार्याध्यक्ष- श्री. किरण टक्केकर, सेक्रेटरी – श्री. हरीश पाटील, उप सेक्रेटरी- श्री नितेश मजुकर, श्री. सिध्दार्थ पाटील, जन संपर्क – श्री. अनंत पाटील, श्री. किरण लोहार, श्री. आकाश हुंदरे, श्री. अजय पाटील, श्री. विठ्ठल पाटील, श्री. तानाजी सुळेभवी, श्री. मनोज बाचोळकर, श्री. सोमनाथ मुचंडी, श्री. आनंद कुंडेकर, सोशल मिडिया- श्री. आनंद शिनोळकर, श्री. आशिष पाटील, श्री. मयूर शहापूरकर, क्रिडा प्रमुख – श्री. रविराज टक्केकर, श्री. गणेश कुगजी, सल्लागार – सर्वश्री आनंद मुचंडी, प्रशांत हुंदरे, राहुल सांबरेकर, अजिंक्य कर्लेकर, प्रविण कुगजी, संतोष मेलगे, गौरेश कुगजी, यल्लाप्पा बस्तवाडकर, भूषण घाडी, किसन कुंडेकर, रितेश मजुकर, यल्लाप्पा पाटील, परशराम मलगे, बसवंत मादाकाचे, भूषण पाटील.

मार्गदर्शक – श्री. बी. बी. पाटील सर, श्री. ए. डी. धामणेकर सर, श्री. आय. बी. राऊत सर

बैठकीला बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *