Thursday , March 5 2026
Breaking News

50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक; लोकायुक्त पोलिसांची कारवाई

Spread the love

बेळगाव : बेळगावच्या जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक आणि सहाय्यक संचालकांना सबसिडी मंजुरीचे पत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सहसंचालक आर. एच. शिवपुत्रप्पा आणि सहाय्यक संचालक पद्मकांत जी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

याबाबत लोकायुक्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या एका योजनेचे लाभार्थी गिरीश कुलकर्णी यांना 50 हजारांची सबसिडी मिळणार होती. त्यासाठी लागणारा आदेश- मंजुरी पत्र देण्यासाठी या दोघा अधिकाऱ्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलीस अधीक्षक यशोदा वंटगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून आज लाचेची रक्कम स्वीकारताना या दोन अधिकार्‍यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेळगाव लोकायुक्त पोलिस करत आहेत. या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *