Tuesday , March 3 2026
Breaking News

मंडोळी गावातील मंदिराच्या विकासासाठी 2 कोटी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 


गावकऱ्यांकडून उत्साहपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंडोळी गावात श्री मारुती, श्री विठ्ठल रुक्माई आणि श्री कलमेश्वर मंदिराच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी कर्नाटक सरकारकडून 2 कोटी रुपये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर करून घेतले आणि 50 लाख मंदिर विश्वस्त समितीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. यामुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले व गावातील नागरिकांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा सत्कार केला.
आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील देवस्थानांच्या विकासासाठी भरघोस अनुदान दिले असून, आगामी काळात आणखी अनुदान आणणार असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील लोकांनी दिलेले प्रेम आणि विश्वास यापेक्षा मोठी देणगी नाही. जनतेचा हा आशीर्वाद असाच चालू राहो, असेही त्या म्हणाल्या.
ग्रामपंचायत अध्यक्षा अश्विनी तलवार, नारायण शिंदे, एपीएमसी अध्यक्षा युवराज कदम, लक्ष्मी कणबरकर, नागेश दोरन्नवर, मारुती मन्नोळकर, सागर दळवी, राजू पाटील, कल्लाप्पा दळवी, यल्लाप्पा पाटील, दीपक नेवगे, शंकर पाटील, खंडोबा पाटील, विनायक राव पाटील, कांबळे पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *