ठाणे : बेळगांव, बिदर, भालकी, धारवाड, कारवारसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घेऊन नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा व तेथील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी “बेळगांव कुणाच्या बापाच” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी केली आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा बेळगावातून सुरू झाला होता. बेळगाव सीमाभागातील मराठी जनता झाली सत्तर वर्षे महाराष्ट्रात येण्यासाठी संयुक्तपणे लढा देत आहेत. या लढ्यात त्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. त्याचा हा लढा कर्नाटकी सरकार नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करत आहे.तेथील आपल्या मराठी जनतेवर अमानुष मारहाण करत, छळत आहे. यातून त्यांना मुक्त करून आपल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असेल..
आपण ठाण्यातील शंभर शिवसैनिकासह स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या आदेशानुसार बेळगांव सीमा लढ्यात सहभागी झाला होता. तेथील पोलीसाचा अमानुष मारहानही सहन करून बेल्लारी तुरूंगात चाळीस दिवस तुरुंगवास भोगला आहे. आपण कर्नाटक सरकारचा अगदी जवळून मराठी जनतेवर होणारा अत्याचार, अन्याय पाहिला आहे. आपण त्यांच्या लढ्याला सदैव सहकार्य केले आहे. आता हा बेळगांव सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे तो लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा.
“बेळगांव कुणाच्या बापाच ते मराठी माणसाच्या हक्काच, नाही कुठल्या करनाटकी बोक्याच…”
Belgaum Varta Belgaum Varta